ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग १८ (ड) मध्ये भाजपचा विजयाचा विश्वास! सुरेश शिवाजी भोईर पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी होणार – जनतेत ठाम सूर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ड) मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार  सुरेश शिवाजी भोईर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, जनतेकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रामाणिक काम, सातत्यपूर्ण सेवा आणि विकासाभिमुख नेतृत्व यामुळे भोईर यांना नागरिकांचा भरभरून पाठिंबा लाभत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मागील कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा थेट फायदा नागरिकांना झाल्याने, “काम करणारा नेता” अशी ओळख सुरेश भोईर यांनी निर्माण केली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे.

प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांकडून “कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा” असा ठाम निर्धार व्यक्त केला जात असून, भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. एकूणच प्रभाग १८ (ड) मध्ये भाजपची बाजू भक्कम होत चालली असून, सुरेश शिवाजी भोईर पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयाकडे वाटचाल करत असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button