प्रभाग १८ मध्ये ऍड. मोरेश्वर शेडगे यांचा थेट जनसंवाद; दर्शन नगरीत घराघरांतून उत्स्फूर्त पाठिंबा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील दर्शन नगरी सोसायटी परिसरात आज घर टू घर प्रचार मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांशी थेट संवाद साधला.
प्रचारादरम्यान ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी परिसरातील नागरी समस्या, विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी काळातील विकास आराखडा नागरिकांसमोर मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. यावेळी “विकास, पारदर्शकता आणि जबाबदारी” हाच आपला प्रमुख अजेंडा असल्याचे शेडगे यांनी स्पष्ट केले.
दर्शन नगरी सोसायटीतील नागरिकांनी या प्रचाराला मोठा प्रतिसाद देत ऍड. मोरेश्वर शेडगे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. घराघरांतून मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि मनःपूर्वक आशीर्वादामुळे प्रभाग १८ मधील निवडणूक लढतीत विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला असल्याचे चित्र दिसून येत आहे.




















