ताज्या घडामोडीपिंपरी

काकडे पार्कमध्ये ‘घराघरांत भाजप’! प्रभाग १८ मध्ये ॲड. मोरेश्वर शेडगेंचा थेट जनसंवाद

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ – काकडे पार्क सोसायटी परिसरात भाजपचे उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी घराघरांत जाऊन थेट जनसंवाद साधत प्रचाराला धार दिली आहे. ‘जनतेशी थेट संवाद, विश्वासाची ग्वाही’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या या भेटींनी प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.

काकडे पार्क सोसायटी परिसरात झालेल्या घरभेटी दरम्यान स्थानिक नागरिकांना आपले प्रश्न, अपेक्षा आणि विकासाबाबतचे विचार थेट मांडण्याची संधी मिळाली. पाणी, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा, सुरक्षितता आणि परिसर विकासाशी संबंधित मुद्द्यांवर नागरिकांनी स्पष्ट भूमिका मांडली. या प्रत्येक प्रश्नाची गंभीर दखल घेत समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार  ॲड.  मोरेश्वर शेडगे यांनी व्यक्त केला.

या संवादादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेला जिव्हाळा, दाखवलेला विश्वास आणि दिलेले उत्साहवर्धक पाठबळ हे भाजपसाठी बळ देणारे ठरत असल्याचे चित्र दिसून आले. “जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हेच आमचे खरे भांडवल आहे. सहकार्याच्या जोरावर अधिक जबाबदारीने आणि दमदारपणे काम करू,” असा विश्वास  ॲड.शेडगे यांनी व्यक्त केला.

प्रभाग १८ मध्ये घराघरांत पोहोचणारा संवाद, प्रश्नांची थेट नोंद आणि विकासाचा ठोस अजेंडा यामुळे भाजपची भूमिका अधिक मजबूत होत असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजप निर्णायक आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत या जनसंवादातून मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button