ताज्या घडामोडीपिंपरी

आज होणार मोरया गोसावी महाराजांच्या दर्शनाने प्रभाग १८ मध्ये विजयाचा शंखनाद व प्रचाराचा शुभारंभ

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रभागात जोरदार तयारी करत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ जाहीर केला आहे. रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चिंचवडगाव येथील महाराष्ट्र श्री गोरक्षनाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन भाजपच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात होणार आहे. धार्मिक वातावरणात प्रचाराचा नारळ फोडत भाजपने निवडणूक रणांगणात ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत.

या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून अपर्णा निलेश डोके (इतर मागास प्रवर्ग – महिला), मनिषा योगेश चिंचवडे (सर्वसाधारण महिला), ऍड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे (सर्वसाधारण – खुला प्रवर्ग) आणि सुरेश शिवाजी भोईर (सर्वसाधारण – खुला प्रवर्ग) हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवारांनी ‘विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्व’ या मुद्द्यांवर प्रचाराची दिशा निश्चित केली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी यामुळे प्रभागात भाजपचे वातावरण अनुकूल असल्याचे चित्र आहे. प्रचार शुभारंभाच्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मतदारांना ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, या प्रभागातील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

एकूणच प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने भाजपने संघटित शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीत आघाडी घेण्याची रणनीती स्पष्ट केली असून, आगामी दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button