चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग क्र. १८ मध्ये मोफत आरोग्य चिकित्सा व होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे जनप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या सौजन्याने आणि योगदान प्रतिष्ठान आणि डॉ.डी.वाय.पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र १८ मध्ये एक दिवसीय मोफत आरोग्य चिकित्सा व होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी *पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे* यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी,आरोग्य सल्ला, तसेच औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महिलांसाठी,ज्येष्ठ नागरिकांसाठी व युवकांसाठी वेगवेगळ्या आरोग्य तपासणी कॅम्पचे आयोजन विशेष ठरले.या शिबिराचा साधारण 132 नागरिकांनी लाभ घेतला.

उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री शत्रुघ्न (बापु) काटे म्हणाले की,”पंतप्रधान मोदी साहेब यांच्या ‘सेवा हीच संघटना’ या संकल्पनेनुसार अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवतात. आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येक व्यक्तीने आरोग्य जागरूकतेकडे लक्ष दिले पाहिजे.”

या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा व औषधांचा लाभ घेतला.

यावेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, राजेंद्र गावडे, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, जेष्ठ नेते महेश कुलकर्णी, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, डॉ. निरीजा क्षीरसागर मॅडम, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, जेष्ठ नेते रविंद्र देशपांडे, प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, मंडळ अध्यक्ष हर्षद नढे, सौ. सोनाताई गडदे, नूतन चव्हाण, दिपालीताई कालापुरे, पल्लवीताई पाठक, गणेश गावडे, प्रदीप सायकर, मनोज ब्राह्मणकर, इतर महिला भगिनी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
सूत्र संचालन अजित कुलथे यांनी केले आणि आभार माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button