ताज्या घडामोडीपिंपरी

यमुनानगरच्या विकासासाठी पुन्हा निर्धार; प्रभाग १३ मधून सुलभा रामभाऊ उबाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल”

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यमुनानगर परिसराच्या विकासाचे शिल्पकार आणि जनसामान्यांचा मजबूत आधार असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार सौ. सुलभा रामभाऊ उबाळे यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.

“नव्या पर्वाची चाहूल, विकासाकडे टाकलंय पाऊल, चला देऊया साथ, धरूया शिवसेनेचा हात!” या घोषवाक्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सुलभा उबाळे यांनी यमुनानगर परिसरात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामाचा थेट लाभ जनसामान्यांना मिळाल्याने त्या ‘लोकांच्या उमेदवार’ म्हणून ओळखल्या जातात.
उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी, “विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पुढील टप्प्यात यमुनानगरचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

या उमेदवारीमुळे प्रभाग १३ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button