ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर येथील  सारिका पवार यांच्या प्रचाराची दमदार सुरुवात; महिला नेतृत्वाचा जयघोष”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीला वेग आला असतानाच, बुधवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगर येथील सिद्धिविनायक मंदिरात एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका महेंद्र पवार यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जनसमर्थनाच्या वातावरणात पार पडला. या शुभारंभाने प्रभागातील राजकीय हालचालींना नवे बळ मिळाले आहे.

भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निलेश नेवाळे यांच्या शुभहस्ते श्रीचरणी नारळ फोडून प्रचाराची मंगल सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रभागातून भव्य, शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान “सारिका तुम आगे बढो”, “महिला नेतृत्वाचा जयघोष” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

रॅलीमध्ये महिलांचा प्रचंड उत्साह, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या निमित्ताने सारिकाताई पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास अधोरेखित झाला. विकासाभिमुख दृष्टिकोन, सेवाभाव आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून सारिका पवार यांच्या कार्याची नागरिकांनी विशेष दखल घेतली.

स्थानिक पातळीवर महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणत समाजहिताचे निर्णय घेण्याची भूमिका सारिका पवार यांनी यापूर्वीही प्रभावीपणे बजावली आहे. त्याच अनुभवाच्या बळावर आगामी महापालिका निवडणुकीत त्या परिवर्तनाचे नेतृत्व करतील, असा विश्वास उपस्थितांमध्ये व्यक्त होताना दिसून आला.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास प्रभागातील महिला-पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच या कार्यक्रमाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2026 मध्ये परिवर्तनाची नांदी ठळकपणे अधोरेखित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button