ताज्या घडामोडीपिंपरी

शिवसेना (उबाठा) आणि वाळके प्रतिष्ठानच्या वतीने दिघी येथे वारकऱ्यांना महाप्रसाद व शिधा वाटप

परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती

Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पुण्याकडे प्रस्थान झाले. आळंदी पुणे रस्त्यावर दिघी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्वर्गीय तानाजी सोपान वाळके प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसाद, शिधा, पाण्याची बाटली आणि चहाचे वाटप करण्यात आले. पाच हजार पेक्षा जास्त वारकऱ्यांनी व भाविकांनी याचा लाभ घेतला. तसेच यावेळी वारकऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, उपशहर प्रमुख राहुल गवळी, शहर समन्वयक कैलास नेवासकर, दिघी विभाग प्रमुख कृष्णाभाऊ वाळके, कार्यक्रमाचे संयोजक व वाळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तानाजी वाळके तसेच प्रमुख शिवसैनिक, दिघी येथील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्पूर्वी बुधवारी (दि.१८) बालेवाडी येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
स्वर्गीय तानाजी सोपान वाळके प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आळंदी येथील शांतीब्रह्म वारकरी गुरुकुल संस्थेस शिधा, बिस्कीट आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ आहेर, शिवसेना शहर संघटक व वाळके प्रतिष्ठानचे संतोष तानाजी वाळके, शिवसेना दिघी विभाग प्रमुख कृष्णाभाऊ वाळके आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi