ताज्या घडामोडीपिंपरी

काळेवाडीत चालणार विनोद नढेंचा भाजप फॅक्टर

“काळेवाडीत भाजपचा धडाका! नढेंचा ‘भाजप फॅक्टर’ ठरतोय निर्णायक”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काळेवाडी परिसरात भाजपचा झंझावात वेग घेत असून, विनोद नढे यांचा ‘भाजप फॅक्टर’ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. घरोघरी संपर्क, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख राजकारण यामुळे नढे यांची प्रचारयंत्रणा प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेताना दिसत आहे.

काळेवाडीतील नागरिकांमध्ये “काम करणारा नेता” अशी नढेंची ओळख पक्की होत चालली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या मुद्द्यांवर नढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच कामांचा लेखाजोखा घेऊन ते मतदारांपुढे जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भाजपच्या संघटनात्मक ताकदीसोबतच नढेंची वैयक्तिक पकड आणि स्थानिक प्रश्नांची अचूक जाण हा काळेवाडीतील निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. प्रचारादरम्यान नागरिक स्वतःहून पुढे येऊन पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. विशेषतः महिला, युवक आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये नढेंच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू आहे.

विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी “वाद नाही, विकासच आमचा अजेंडा” अशी ठाम भूमिका नढे घेत आहेत. त्यामुळे नकारात्मक राजकारणाला फारसा प्रतिसाद न मिळता, विकासाच्या मुद्द्यांभोवतीच निवडणूक फिरताना दिसते आहे.

काळेवाडीत नढेंचा भाजप फॅक्टर निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. सध्याचे वातावरण पाहता भाजप आणि नढे यांची जोडी काळेवाडीच्या राजकारणात नवे समीकरण घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button