भाजपचा प्रचार टॉप गिअरमध्ये! प्रभाग २२ मध्ये विनोद नढे यांचा तुफानी दौरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात धार्मिक श्रद्धा, जनसंपर्क आणि विकासाचा ठोस अजेंडा यांचा समन्वय साधत त्यांनी मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रचार दौऱ्याची सुरुवात श्री. विनोद नढे यांनी कालेवाडी येथील ग्रामदेवीच्या दर्शनाने केली. देवीच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी शक्ती व आशीर्वाद मागितले. त्यानंतर ज्योतिबानगर परिसरात घराघरांत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. आजाद कॉलनीतील गल्लीनिहाय प्रचार करत ‘१, २, ३’ या ठिकाणी मतदारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका आणि भविष्यातील विकास आराखडा स्पष्ट करण्यात आला.
प्रचारादरम्यान श्री. विनोद नढे यांनी पत्रक वाटप करत भाजपने शहराच्या विकासासाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत भाजपची ठोस भूमिका मांडण्यात आली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुभेच्छा देत “विकासासाठी पुन्हा एकदा भाजपलाच संधी द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोकांनी उमेदवाराचे स्वागत करत आपल्या समस्या आणि अपेक्षा थेट मांडल्या. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आमदार, खासदार आणि केंद्रातील मजबूत नेतृत्वाच्या बळावर प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास साधू,” असा विश्वास श्री. विनोद नढे यांनी व्यक्त केला.
लोकनेते स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शक्ती स्थळाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.
एकूणच, धार्मिक आस्था, थेट जनसंवाद आणि विकासाचा स्पष्ट रोडमॅप यामुळे भाजप उमेदवार श्री. विनोद नढे यांचा हा प्रचार दौरा प्रभाग २२ मधील राजकीय वातावरण अधिक तापवणारा ठरत असून, आगामी निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत देत आहे.




















