ताज्या घडामोडीपिंपरी

राजकारणाच्या चौकटीबाहेरचा जनतेचा हक्काचा आवाज” – प्रभाग २२ मध्ये विनोद नढेंच्या पाठीशी नागरिकांची भक्कम ताकद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  विनोद नढे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करताच राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळाल्याचे चित्र आहे. प्रभागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध घटकांनी एकत्र येत ‘विकासासाठी एकजूट’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.

प्रभाग २२ मधील नागरी व औद्योगिक परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच प्रशासनाकडून होणारी दुर्लक्षाची भावना लक्षात घेता, आता बदल हवा अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे. “राजकारणाच्या चौकटीबाहेरचा जनतेचा हक्काचा माणूस” म्हणून विनोद नढे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उभे राहत आहेत.

नढे यांना स्थानिक व्यापारी, छोटे उद्योजक, महिला बचत गट, युवक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि सांस्कृतिक विकास या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेला स्पष्ट अजेंडा प्रभागातील जनतेला भावला आहे.
प्रचारादरम्यान झालेल्या बैठका, संवाद मेळावे व सामाजिक कार्यक्रमांतून ‘काम करणाराच प्रतिनिधी हवा’ असा सूर उमटत आहे. कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी थेट प्रशासनाशी भिडणारे नेतृत्व म्हणून विनोद नढे यांची ओळख अधिक ठळक होत चालली आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक २२ मध्ये यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता, विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी बनत असल्याचे चित्र असून, येत्या काळात विनोद नढे यांच्या प्रचाराला आणखी गती मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button