ताज्या घडामोडीपिंपरी
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वाढदिवसानिमित्त विजय सुतार यांनी फुकले रणशिंग
सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

काळेवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजयनगर काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन आदर्श घडविला.
वाढदिवसानिमित्त विजयनगर येथील जिजाऊ क्लिनिक येथे वृक्षारोपण कार्यक्रम, स्नेह छाया प्रकल्प दिघी येथील विद्यार्थ्यांना अन्नदान सामुग्री देऊन व नगद नारायण वारकरी संस्था आळंदी येथील वारकरी मुलांना अन्नदान सामग्री व रात्री काळेवाडी प्रभागातील महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने वाढदिवस साजरा केला, कोठे बॅनरबाजी न करता एक सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा विजय भाऊ सुतार मित्रपरिवाराने निर्णय घेऊन स्तुत्य उपक्रम राबवल्याने काळेवाडी परिसरातील नागरिकांनी शुभेच्छाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काळेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विजय सुतार नेहमी अग्रेसर भूमिका घेत, शासन दरबारी मांडत असतात .ड्रेनेज लाईन ,लाईट, रस्ते अशा विविध समस्या विजय सुतार सोडवत असतात. अभिष्टचिंतनानिमित्त काळेवाडी परिसरातील मोठ्या संख्येने महिला व सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.













