मोरेवस्ती परिसरातील हातभट्टी दारू व अनधिकृत हॉटेलमधून चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घाला – विजय जरे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली पोलीस स्टेशन येथे मोरेवस्ती परिसरातील हातभट्टी दारू व अनधिकृत हॉटेलमधून चालणाऱ्या अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी चिखली पोलीस स्टेशनला निवेदन दिले..
मोरेवस्ती परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली अवैध दारू विक्री ही युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढवणारी ठरत आहे तसेच परिसरातील महिलांना व कुटुंबांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तत्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
8 दिवसायच्या आत ठोस कारवाई झाली नाही तर स्वराज्य पक्षाच्या वतीने तोडफोड करण्यात येईल आणी याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल.
या निवेदनप्रसंगी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे,विद्या शेवाळे, पूनम मॅडम महाडिक, प्रतिभा काळे, योगेश सोनावणे, समाधान जाधव, सचिन शिंदे, किशोर तेलंग, स्वप्नील शेंडगे, रंगनाथ भंडारी,यश कारले, सागर शेंडगे यांची उपस्थिती होती.














