विजय भिसे यांची भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय भिसे यांची भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली.
विजय भिसे यांनी पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या गावात कला, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रुजवात करण्याचा प्रयत्न केला आहे. १९८५ साली युवा कला संवर्धन या संस्थेच्या माध्यमातून शहरभर ,विविध स्तरावरील साहित्य संमेलने आणि व्याख्याने यांचे आयोजन केले होते. तेव्हापासून त्यांचा हा प्रवास सुरू आहे. पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनची स्थापना करून गुणवंत कलाकारांना पिंपरी चिंचवडचा प्रतिष्ठेचा ‘कलाविभूषण पुरस्कार’ सुरू केला आहे. यामध्ये गायिका सावनी रवींद्र, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायिका राधा मंगेशकर आणि नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखतही विशेष गाजली.
भिसे यांच्या विविध कामांची दखल घेत आमदार शंकर जगताप यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड केली. तोच विचार करून नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी नुकतीच पुन्हा या पदावर त्यांची निवड केली















