ताज्या घडामोडीपिंपरी

वैष्णवी हगवणे – कस्पटे प्रकरणानंतर मराठा समाजाची बैठक

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज महत्वाच्या सामाजिक विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच आपल्या शहरातील कन्या वैष्णवी हगवणे – कस्पटे हिच्या बाबतीत जी दुर्घटना घडली त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर पडले आहेत. या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्नव्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत.

याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाच्या धोरणात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कै. वैष्णवीस श्रद्धांजली अर्पण करून सदर बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत समाजाची भविष्यातील वाटचाल व त्यासंदर्भात काही नियम व धोरणे निर्धारीत करण्यात आली आहेत. लग्न व्यवस्था व इतर कार्यक्रम व समारंभ याबाबतीत आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे. सर्व समाज बांधवांनी या आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव व इतर समाजबांधवही उपस्थित होते. हा विषय फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नसल्याने इतर समाज बांधवांनाही बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बऱ्याच उपस्थितांकडून वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या सदर सूचनांचा समावेश आचारसंहितेत करण्यात येणार आहे.

सभेचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले व सभा घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन श्री नाना शिवले यांनी तर प्रशांत शितोळे यांनी आचारसंहितेचे वाचन करून आभार मानले. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, विलास लांडे, संजोग वाघेरे पाटील, सुरेश भोईर, नाना काटे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक, राजेंद्र कोंढरे, महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे प्रमुख सतीश दरेकर, भानुप्रताप बर्गे , राजेंद्र कुंजीर, पुणे शहर समन्वयक सचिन आडेकर, मराठा महासंघ संपर्कप्रमुख अनिल तागडे, हा कोंडे सचिन, सचिन साठे, अतुल शितोळे, एन बी भोंडवे, मधुकर मास्तर चिंचवडे, धोंडीबा भोंडवे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

कळावे,
भाऊसाहेब भोईर
मा. नगरसेवक :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button