‘उन्न’ती’ नवरात्रोत्सव २०२५ ; हिरव्या रंगात पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशनच्या नवरात्रोत्सव २०२५ च्या पाचव्या दिवशी, हिरवा रंग साजरा करत वृक्षारोपण उपक्रमलिनिअर गार्डन, गोविंद-यशोदा चौक, पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे आणि वनराई वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
उन्नती सोशल फाउंडेशन नवरात्रीच्या वेगवेगळ्या रंगानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. या पार्श्वभूमीवर हिरव्या रंगासाठी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले, ज्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला.
डॉ. कुंदा संजय भिसे, अध्यक्ष, उन्नती सोशल फाउंडेशन यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले , “वृक्षारोपण हा फक्त पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाला निसर्गासोबत जोडणारा संदेश आहे. आजच्या पावन दिवशी, हिरव्या रंगाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना वृक्षपालनाची महत्त्वाची कल्पना समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक लहान पाऊल, प्रत्येक रोप आपल्याला शुद्ध हवा, निसर्गाची सुगंध आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवळ देण्याचा संदेश देते. आमच्या समाजातील युवक, वृद्ध, महिला व लहान मुलांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिकच अर्थपूर्ण झाला आहे. आम्ही पुढील वर्षी या उपक्रमास अजून व्यापक रूप देऊन पर्यावरण संवर्धनासाठी लोकांना प्रोत्साहित करू.”
उन्नती सोशल फाउंडेशनची पुढील योजना नवरात्रोत्सवात रंगानुसार वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याची आहे, ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश असेल.
या कार्यक्रमास उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा संजय भिसे यांच्यासह संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सदस्य, ऑल सीन सीनियर सिटीजन असोसिएशनचे सदस्य, आनंद हास्य क्लबचे सदस्य, उन्नती सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि उन्नती सखी मंचचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













