उन्नती सोशल फाउंडेशन तर्फे गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर व शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गौरी-गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक सन्मान कार्यक्रम पिंपळे सौदागर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा व भा.ज.पा. चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. गौरी-गणपती सजावट ४८ स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले. विजेच्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ,शिक्षक दिनानिमित्त पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील २९७ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांतील शिक्षकांचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या की, “उन्नती सोशल फाउंडेशन नेहमीच समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेत असते. शिक्षकांचा सन्मान हा समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येक दीपस्तंभाला सलाम करण्याचा क्षण आहे. तसेच गौरी-गणपती सजावट स्पर्धेतून सांस्कृतिक वारसा व सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज नागरी पतसंस्था चेअरमन सुनील कुंजीर यांनी केले.
याप्रसंगी , उन्नती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक संजय तात्याबा भिसे , पी.के. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ आप्पा काटे , जिल्हाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड सांस्कृतिक प्रकोष्ट पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) विजय भिसे , ज्येष्ठ मुख्याध्यापिका मालती वाणी , उन्नती सखी मंच उपाध्यक्षा डॉ. रश्मी मोरे , आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, मीनाक्षी देवतारे, अशोक वायकर, विजय भिसे, ऑल सिनिअर सिटीझन असोसिएशनचे सुभाषचंद्र पवार, विजय बांगरे, पी.के. इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री सोनवणे यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.













