ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी–चिंचवडचे शिल्पकार स्व. अजितदादा पवार यांना उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे शोकसभेद्वारे श्रद्धांजली

Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर यांच्या वतीने उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

या शोकसभेत स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय व विकासाभिमुख कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेविका डॉ. सौ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “पिंपरी–चिंचवड शहराचे शिल्पकार अजितदादा होते. त्यांनी स्व. लक्ष्मणभाऊंच्या साथीने शहराच्या पायाभूत सुविधांचा दूरदृष्टीने विकास केला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक व नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांत त्यांच्या ठोस निर्णयांमुळेच आज पिंपरी–चिंचवड शहराचे भव्य-दिव्य स्वरूप दिसून येते. त्यांचे नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि विकासाची बांधिलकी ही कायम स्मरणात राहील.”

शोकसभेस नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

याप्रसंगी ,  सूत्रसंचालन सुनील कुंजीर यांनी केले.   उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक  संजय भिसे , कैलास प्रधान कुंजीर, वाल्मिक काटे ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनयर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य परिवार, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय यांचे प्रतिनिधी तसेच , पिंपळे सौदागर , रहाटणी परिसरातील सोसायटीचे चेअरमन , पदाधिकारी नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button