ताज्या घडामोडीपिंपरी

उन्नती सोशल फाउंडेशनचा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

२५० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप आणि ०५ लाख रुपयांची वस्तू व रोख स्वरूपात मदत

Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उन्नती सोशल फाउंडेशनने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ, शेळकाधानोरा, शिरपुरा (तालुका: कळंब, जिल्हा: धाराशिव) तसेच पालसिंघण (ता. बीड, जि. बीड) या गावांतील आपत्तीग्रस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या कटीबद्ध प्रयत्नांमुळे प्रभावितांना आवश्यक वस्तू तसेच आर्थिक आधार मिळाला.

या मोहिमेत अन्न, वस्त्र, जीवनावश्यक साहित्य, शालेय साहित्य (बॅग, पुस्तके, वह्या, शाळा बूट) यांचा समावेश होता. तसेच जनावरांसाठी पशुखाद्य आणि इतर आवश्यक वस्तू वितरीत करण्यात आल्या. एकूण धान्याचे २५० किट आणि वस्तू स्वरूपात ₹5 लाखांची मदत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या मार्फत करण्यात आली. मदत किटमध्ये ब्लँकेट , गहू, तांदूळ, पीठ, साखर, तेल, साबण, वस्त्र, शाळेची बॅग, पुस्तके, वह्या आणि शाळा बूट यांचा समावेश होता. उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक श्री संजय भिसे यांनी स्वतः पूरग्रस्त गावांना भेटी देऊन मदत वितरित केली. तसेच ; पुरात घराचे व पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान झालेल्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली.

उन्नती सोशल फाउंडेशन नेहमीच आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहते. यापूर्वी सातारा, सांगली, कोल्हापूर महापुरात तसेच केरळ महापुरात त्यांनी भरीव मदत केली होती. या परंपरेला कायम ठेवत त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा भरीव मदत केली आहे, ज्यामुळे पूरग्रस्तांना तातडीचा आधार मिळून , दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आधार मिळाला आहे.

या मोहिमेत स्थानिक संघटनांचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे ठरले. ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, विठाई वाचनालय, आनंद हास्य क्लब आणि लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघ , उन्नती सखी मंच, कुणाल आइकॉन मधील सीनियर सिटिझन व गुजराती सिनियर सिटिझन यांनी विशेष सहकार्य करून आपली मदत उपलब्ध करून दिली. पिंपळे सौदागर परिसरातील रहिवासी सोसायटी मधील स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था देखील सक्रिय सहभागी होऊन या मोहिमेला यशस्वी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button