चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिवस अनुषंगाने कार्यशाळा

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हडपसर पोलिस स्टेशन व चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी शिबिर आयोजित करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी साप्ताहच्या प्रसंगी अमली पदार्थाचे दुष्परिणाम , व जनजागृती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रसंगी पो नि अश्विनी जगताप,सपोनि हसीना शिकलगार यांनी अंमली पदार्थांचे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक परिणाम याविषयी मुलींना मार्गदर्शन केले. तसेच अमली पदार्थ व्यसनमुक्त समाज घडवण्याची प्रतिज्ञा करत संकल्प केला.
सदर कार्यशाळेकरिता PI अश्विनी जगताप API हसीना शिकलगार, HC समीर पांडुळे LPC धनश्री बांडे PC महादेव कुंभार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक उर्मिला पाटील, उपमुख्याध्यापक आनंद करे पर्यवेक्षक पौर्णिमा सावंत, तृप्ती पाटील, मंदाकिनी शिंदे,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर लालासाहेब खलाटे, लाईफ वर्कर तुकाराम डोंगरे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उपशिक्षक शितल जगताप यांनी केले.













