शहरात तुलसी विवाह विविध मंदिरांमध्ये उत्साहाने साजरा

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुलसी विवाह दापोडी सांगवी पिंपळे गुरव फुगेवाडी कासारवाडी येथील विविध मंदिरांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला.
आज सजली तुळस शालू हिरवा नेसून कृष्ण भेटीसाठी तिचे मोहरल पान पान अंगणात उभारला आज विवाह मंडप ऊस झेंडूच्या फुलांची त्याच सजली आरास… मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनो तुम्हाला तुळशी विवाह निमित्त शुभेच्छा
हिंदू धर्मात तुळशी विवाहाला धार्मिक महत्त्व आहे तुळशी माते सोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा या दिवशी विवाह आयोजित केला केला जातो. विधी नुसार या दिवशी तुळशी शाळीग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येथे कधीकधी उत्सव पाच दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होतो. अशा या विवाहासाठी विविध मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह यानिमित्त तुळशी विवाह धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. मंदिरामध्ये यावेळी सनई चौघडा सचिन काटे, गणेश पाचंगे, राजेंद्र गरुड, अभिषेक पाचंगे भरत पांडे आणि सनई चौघडा चे वादन केले तुळशी विवाहमध्ये फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या या तुळशी विवाह साठी यावेळी मंगलाष्टका पुरुष व महिलांनी यावेळी मंगलाष्टका बोलल्या ,यावेळी रिधिमा काटे, राजश्री बाईत,शुभांगी काटे, प्रतिभा जवळकर,अस्मिता कांबळे, पोर्णिमा यादव, सुरेखा काटे,हेमा नायडू, वैशाली शेळके, स्वाती काटे, साक्षी सावंत, नंदिनी शेट्टी, आदी महिलांनी विवाह निमित्त विठ्ठल रुक्मिणी व राधाकृष्ण यांच्यावर पुष्पवृष्टी केली.
विविध सामाजिक धार्मिक या विवाहासाठी उपस्थित होते यावेळी कैलास वाशी रघुनाथ जवळकर यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद देण्यात आला.




















