ट्रायबल फोरमच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ तळपे आणि कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय गवारी यांची निवड

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी अस्तित्व आणि आत्मसन्मानासाठी ट्रायबल फोरम, पुणे ही कॅडरबेस संस्था गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. या ट्रायबल फोरम मध्ये सहभागी होऊन निस्वार्थीपणे समाजासाठी समर्पित होऊन काम करणारे एकनाथ तळपे यांची ट्रायबल फोरम च्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी आणि कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय गवारी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
ट्रायबल फोरम चे रोहित सुपे, खेड तालुका अध्यक्ष तानाजी भोकटे, खेड बाजार समिती माजी उपसभापती विठ्ठल उनघरे, माजी नगरसेवक राहूल आढारी, बाजार समिती संचालक सुधिर भोमाळे, युवानेता संतोष भांगे यांनी नूतन अध्यक्ष एकनाथ तळपे आणि कार्याध्यक्ष दत्तात्रय गवारी यांचे अभिनंदन केले आहे.













