ताज्या घडामोडीपिंपरी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने  तिन्हेवाडी येथे 300 देशी वृक्षांचे रोपण

Spread the love

                             

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय, पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या आस्थापनांमधील कामगार एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच जंगली प्राण्यांनाही निवारा मिळत आहे, असे मत कामगार कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, राजगुरुनगर कामगार कृती समिती, साद फाउंडेशन आणि खान्देश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,तिन्हेवाडी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्हेवाडी जिल्हा परिषद शाळा व त्रिमूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तिन्हेवाडी येथील त्रिलोकेश्वर महादेव मंदिराजवळील गायराण क्षेत्रात पिंपळ,जांभूळ,चिंच, हिरडा,कडुलिंब, कांचन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 300 देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी सुजाता इळवे, तिन्हेवाडीच्या सरपंच प्रतिक्षा संतोष पाचारणे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष ,दत्तात्रेय येळवंडे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सीईओ ,दिलीप बटवाल,पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज पाटील, सी.आय.इंडिया गिअर चाकणचे ,अरविंद साहू, कामगार भूषण ,गणेश वाघ,राजेंद्र वाघ,गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,यांच्यासह मंडळाचे कर्मचारी, राजगुरुनगर लॉ कॉलेजचे शिक्षक विद्यार्थी, गुणवंत कामगार व कामगार कुटुंबीय मोठ्या संख्य़ेने उपस्थित होते. यावेळी राजगुरुनगर कामगार कृती समिती व साद फाउंडेशनच्या वतीने कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचा सत्कार करुन मानपत्र देण्यात आले. तसेच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल साद फाउंडेशनचे .दत्तात्रय दगडे व साखरचंद लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजगुरुनगर कामगार कृती समितीचे अध्यक्ष सदाशिव आमराळे, उपाध्यक्ष दत्तात्रय दगडे,भरत उढाणे, रामदास सैंदाणे, श्री.नागेश दळवी,बाबासाहेब वाणी, प्रकाश पटारे,अविनाश वाडेकर,कमलेश गावडे,तानाजी पाचारणे,शंकर नाणेकर, गोकुळ भामरे,दीपक निकुमे,ललित जाधव, शंकर नानेकर यांनी प्रयत्न केले.

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक प्रदीप बोरसे ,अविनाश राउत,सहाय्यक लेखा अधिकारी उद्धव रासने,अधीक्षक संजय थोरात सह
गुणवंत कामगार मोहम्मदशरीफ मुलांनी,संगिता जोगदंड,बाळासाहेब साळुंके ,महेंद्र गायकवाड ,रामदास शिंदे ,धुमाळ नंदकुमार,सुर्यकांत बरसावडे, रविंद्र रायकर इत्यादींनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.सदाशिव आमराळे यांनी सूत्रसंचालन श्री.भरत उढाणे यांनी व आभार चाकण कल्याण केंद्राचे केंद्र संचालक श्री.अविनाश राऊत यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button