साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त “फोक परंपरा ” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रवेश विनामूल्य

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कलारंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने the folk परंपरा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समता, न्याय आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, यामध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित कलाविष्कार सादर केले जातील. हा सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरेल.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि या महान साहित्यिकाच्या कार्याला सन्मान देण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांना, युवक-युवतींना, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रक आमदार अमित ग्गोरखे यांच्याकडून करण्यात आले आहे.













