कै. तुकाराम तनपुरे फौंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन आयोजित मोफत वैद्यकीय सेवा व मोफत औषध गोळ्या वाटप केले.वारी म्हणजे , सेवा , श्रद्धा आणि समर्पणत्याच अनुषंगाने देहू ते पंढरपूर पायी चालणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांना मोफत वैद्यकीय सेवा देणायत आली.
अनेक भाविक वारकरी वेगवेगळ्या गावातून शहरात येतात काही वेळेस वातावरण बद्दलामुळे किंवा पावसामुळे आजारी पडतात , ह्या मुके कोणत्याही भाविकांची वारी चुकू नये ह्या साठी मागील १५ वर्षांपासून कै तुकाराम तनपुरे फौंडेशन कार्य करीत आहे , दर वर्षी सुमारे १००० व अधिक वारकरी ह्या सेवेचा लाभ घेतात , ह्या मध्ये वेदांत हॉस्पिटल व धनश्री हॉस्पिटल चे डॉक्टर , सिस्टर व नर्स सहभागी होतात व विश्वभारत व विश्वासस्वास्थ आयुर्वेदिक क्लिनिक चे वैद्य सहभागी होऊन नैसर्गिक पद्धतीने भाविकांना उपचार देतात .
त्याच बरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी वारकर्यांना पायाला तेल लावून मसाज करतात.
कार्यक्रमास उपस्थित डॉ प्रकाश साखलळकर डॉ शरदचंद्र जगमवार व कामगार कल्याण सहाय्यक आयुक्त श्री मनोज जी पाटील साहेब यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या .
सर्व सुरळीत नियोजन पार पडावे ह्या करिता संस्थाचे अध्यक्ष अशोक तनपुरे , वासुदेव काळसेकर , कु प्रथमेश आंबेरकर, संदीप रांगोळे व धनंजय आव्हाड , विजयकुमार अब्बाड यांनी केले.
ह्या सर्व गोष्टी करिता सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र काळभोर यांनी जागा उपलब्ध करून दिली.
त्यासोबत संस्थाचे कुणाल बडीगर , नितीन मोरे , शर्मा , मुकेश चुडासमा , मुकेशजी , मिरजापुरे , लक्ष्मण शिंदे , राजू जाधव , घरकुल विभाग यांनी अति मोलाचे कर्तव्य बजावले.













