माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या हस्ते प्रभाग १२ मधील स्वच्छता व सामाजिक सेवकांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप
प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने सफाई कामगारांना दिवाळी भेट वस्तू वाटप

तळवडे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “दिवे लावून घर उजळतं, पण माणसांच्या हास्याने समाज उजळतो,” या भावनेला साजेशा वातावरणात प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने सफाई कामगार, घंटागाडी कामगार, ड्रेनेज सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंध नागरिक तसेच बचत गटाच्या कॉर्डिनेटर व सहयोगिनींना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी निःशब्दपणे योगदान देणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य म्हणजेच ‘सोनेरी दिवाळी’, असे समाधान व्यक्त करत नगरसेवक भालेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमास रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत पतंगे, अध्यक्ष प्रभाकर चौधरी, रमेश पाटोळे, कॅ. कदम, अरुण वाळुंजकर, रमेश शेठ भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, भाजपा शहर चिटणीस शिरीष उतेकर, महिला कोषाध्यक्ष अस्मिताताई भालेकर, शहर संघटिका शितलताई वर्णेकर, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम खेडकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विलास आबुज, दत्ता चव्हाण, स्वप्निल वाघमारे, नारायण माळी, सचिन गायकवाड, दिग्विजय सवाई, कमलेश भालेकर, तुषार भालेकर, निलेश भालेकर, अभिषेक भालेकर, हर्षल भालेकर, सचिन भालेकर, संतोष निकाळजे, प्रदीप जैसवाल इत्यादी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.




















