ताज्या घडामोडीपिंपरी

तळवडे प्रभाग क्र. १२ : ‘फेक नरेटिव्ह’चा भाजपने फोडला भांडाफोड — मतदार यादीतील तांत्रिक त्रुटींवर तत्पर दखल

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला कथित ‘फेक नरेटिव्ह’ भारतीय जनता पक्षाच्या तात्काळ आणि सक्रिय हस्तक्षेपामुळे फोल ठरला आहे. मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्र. ७ हा प्रभाग १ मध्ये जोडला गेला होता. या चुकीकडे सर्वप्रथम लक्ष वेधणारे माजी नगरसेवक शांताराम भालेकर होते. मात्र, शहरभरात मतदार याद्यांतील विसंगती सर्वत्र झाली असताना ही एक तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी त्याला राजकीय वळण देत भाजपवर संगनमताचे आरोप केले.

विशेष म्हणजे, यादी भाग क्र. ७ मध्ये केवळ त्यांचेच नव्हे तर भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांची नावे देखील गेली आहेत. अरुणा भालेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे प्रभाग ११ मध्ये, तर माजी नगरसेवक शांताराम भालेकर व कोषाध्यक्षा ईच्छुक उमेदवार अस्मिता भालेकर यांच्या कुटुंबीयांची नावेही यादी भाग ७ मध्येच असल्यामुळे राष्ट्रवादीचे आरोप निराधार ठरले आहेत.

राष्ट्रवादीने केवळ १२६१ मतांचा असलेल्या यादी भाग ७ वर लक्ष केंद्रीत केले, परंतु वास्तवात त्रिवेणीनगरमधील यादी भाग ११४, ११६, ११७ आणि ११८ या क्षेत्रांतील २२०० पेक्षा अधिक मतदार प्रभाग ११ मध्ये स्थानांतरित झाल्याचा मोठा मुद्दा त्यांनी जाणीवपूर्वक दडवला, असे भाजपचे म्हणणे आहे.

मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या पुढाकाराने घराघरांत जाऊन मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आल्या.

निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी भाजप नेहमीच सुपरॲक्टिव्ह राहील, असा ठाम संदेश प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देऊन पक्षाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button