तळेगाव दाभाडेमध्ये ०२ मे रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था व आर.एम.के. स्पेसेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी दिली.
हा नोकरी महोत्सव येत्या ०२ मे रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे होणार आहे. यामध्ये दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नोकरी महोत्सवाचे नियोजन ऍड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे व महेश निंबाळकर, तसेच इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, युवा उद्योजक रणजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.









