चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

सुरेश भोईर ऑन फायर! प्रभाग १८ मध्ये राजकीय वातावरण तापले

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे प्रभाग क्रमांक १८ मधील ताकदवान नेतृत्व सुरेश भोईर यांनी केलेल्या दणदणीत शक्तीप्रदर्शनाने चिंचवडच्या राजकारणाला जबरदस्त धक्का दिला आहे.जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे चिंचवडच्या राजकीय मैदानात एकच खळबळ उडाली आहे.

सन २०१७ मध्ये सर्वाधिक मते मिळवत विजय खेचून आणणारे सुरेश भोईर हे प्रभाग १८ मधील विकासाचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात. मागील नऊ वर्षांत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, मंदिरे, सभामंडप, नागरिक सुविधा आदी कामांचा सपाटा लावत त्यांनी “काम बोलेल” हीच आपली राजकीय ओळख निर्माण केली आहे.

भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत तरुण, महिला, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, यामुळे ही रॅली केवळ शक्तीप्रदर्शन न राहता जनसमर्थनाचे प्रदर्शन ठरले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मजबूत पकड, सततचा जनसंपर्क आणि थेट संवाद यामुळे भोईर यांची लोकप्रियता शिखरावर असल्याचे या रॅलीतून दिसून आले.

या शक्तीप्रदर्शनामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणातही हालचालींना वेग आला असून, भोईर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे विरोधकांच्या गोटात मात्र शांतता पसरली असून, चिंचवडगावात भोईरांची वाढती ताकद डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
या ‘पॉवर शो’नंतर प्रभाग १८ मध्ये एकच चर्चा — “भोईर पुन्हा मैदानात, विजयाचा दावा मजबूत!” अशी राजकीय हवा तयार झाली असून, येत्या काळात चिंचवडचे राजकारण अधिकच तापणार, हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button