माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या पुढाकाराने स्वदेशी वस्तूंचा दिवाळी महोत्सव

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगदान प्रतिष्ठान चिंचवड व माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक ११ अॅाकटोंबर २०२५ रोजी माजी नगरसेविका कांताताई मोंढे व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, महेश कुलकर्णी, रवींद्र देशपांडे, सेवा भारती महाराष्ट्र प्रांत लक्ष्मीकांत देशपांडे,सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा प्रदेश सदस्य अजित कुलथे, प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, प्रदिप सायकर, रवींद्र प्रभुणे, डॉक्टर अजित जगताप, गणेश गावडे, योगेश चिंचवडे, शिवम डांगे, सुभाष पंडित, नंदकुमार मुरडे, शोभा भराडे, दीपाली कलापुरे, पल्लवी पाठक, सुरभी उमदी, चैताली भोईर, सुषमा वैदय, मीनाक्षी इंगळे, रेखा जाजू , समृद्धी भावे, नकुल भोईर, मधुकर कुलकर्णी, पंजाबराव मोंढे उपस्थित होते
सदर प्रदर्शनामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले दिवाळीतील सजावट वस्तू आकाश कंदील दिवे पारंपारिक फराळ गोडधोड नमकिन खाद्य पदार्थ, इतर व्यावसायिक पदार्थ कपडे ज्वेलरी मेहंदी खेळणी घरातील शोभेच्या वस्तू टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूं दिवाळीनिमित्त उठणे साबण विविध प्रकारच्या रांगोळीचे छाप आर्टिफिशल रांगोळी तसेच विविध घरगुती खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते सदर प्रदर्शन 11 व 12 ऑक्टोंबर या दोन दिवसात दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आठवडे बाजार मोरया गोसावी क्रीडा संकुल समोर सुरू होते यामध्ये हजारो नागरिकांनी भेट देऊन आपल्या भागातील महिलांच्या उद्योगाला चालना मिळावी म्हणून खरेदी देखील केली.
माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या माध्यमातून गेले सहा वर्ष आपल्या भागातील महिला बचत गट व महिला भगिनींसाठी विनामूल्य स्टॉलचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यामध्ये जवळपास १२५ महिलांनी आपापले स्टॉल लावले होते.
सदर स्टॉलचे यशस्वी आयोजन योगदान प्रतिष्ठान चे अध्यक्ष नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी केले होते यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील महिला भगिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होते













