ताज्या घडामोडीपिंपरी

शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक १३ मधून सुलभा रामभाऊ उबाळे आज भरणार उमेदवारी अर्ज

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक १३ मधून सौ. सुलभा रामभाऊ उबाळे उद्या, सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने यमुना नगर परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

“चला विकासासाठी साक्षीदार व्हायला… चला उमेदवारी अर्ज भरायला” या घोषवाक्याखाली निघणारी ही रॅली युवक चौक कार्यालयापासून सुरू होऊन यमुना नगरातील विविध प्रमुख चौक, नागरी वस्ती आणि सार्वजनिक ठिकाणांमधून मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्थानिक विकासाचा आराखडा, नागरिकांच्या समस्या आणि आगामी काळातील नियोजन थेट जनतेसमोर मांडले जाणार आहे.

सुलभा उबाळे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरण, युवकांचे प्रश्न, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. जनतेशी थेट संवाद साधणारी आणि कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारी नेतृत्त्वशैली ही त्यांची ओळख आहे.

“नव्या पद्धतीने चालू, विकासाकडे टाकूया पाऊल” या भूमिकेतून त्यांनी प्रभाग १३ मधील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीत ही लढत अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button