ताज्या घडामोडीपिंपरी

“आपुलकीच्या भेटीने ज्येष्ठ भारावले”! – शिवसेनेच्या वतीने निगडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

आमच्याविषयीचा आदर भावला; ज्येष्ठांची प्रतिक्रिया

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनेच्या वतीने निगडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. छत्री वाटपामागील आदर युक्त भावना आणि आमचा केलेला विचार यामुळे आम्ही हरकून गेलो अशा प्रतिक्रिया यावेळी जेष्ठ नागरिकांनी दिल्या. प्रत्येक घटकाचा विचार आणि प्रत्येकाला आदर हीच शिवसेनेची ओळख आहे असे यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, शिवसेना खासदार, शिवसेना उपनेते श्रीरंग आप्पा बारणे व शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या नेतृत्वाखालीप्रभाग क्र. १३ यमुनानगर निगडी सेक्टर २२ येथील जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना – पुणे जिल्हा (शिरूर लोकसभा) अध्यक्ष अजिंक्य रामभाऊ उबाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, तसेच माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, संजय बोराडे, नारायण पाटील, अंकुश जगदाळे,तुकाराम वारंगे दादा पळसकर, प्रिया जपे, दमयंती गायकवाड, संगीता तुपके, नयना पारखे, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक कुटुंबातील नव्हे तर समाजाचा आधार असतात. मात्र त्यांना गृहीत धरले जाते. घरातले वर्तमानपत्र असू देत किंवा छत्री शिल्लक असेल तर ती त्यांची असते. गोष्ट शुल्लक आहे मात्र तितकीच महत्त्वाची आहे. हेच ओळखून त्यांच्या हक्काची छत्री ज्येष्ठ नागरिकांना आज वाटप करण्यात आली. ही छत्री त्यांच्या हक्काची असेल जशी शिवसेना प्रत्येक घटकाच्या हक्काची आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारी आहे. कोणत्याही संघर्षात रस्त्यावर सुद्धा उभी ठाकणारी आहे.

ताईंकडून आदर; ज्येष्ठ भारावले

निगडी यमुना नगर परिसरामध्ये सुलभा उबाळे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी विविध उपक्रम नेहमीच राबवले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, विरंगुळा केंद्र, सुसज्ज फुटपाथ बांधून आमचा नेहमीच विचार केला. आज छत्री वाटप कार्यक्रमातून कुटुंबातील सदस्याप्रमाणे छोट्याशा गोष्टीतही मोठा विचार त्यांनी केला. त्यामुळेच त्या आमच्या हक्काच्या वाटतात त्यांच्या या आदर युक्त विचारामुळे आम्ही भारावलो अशा भावना ज्येष्ठांनी यावेळी व्यक्त केल्या.

सुलभा उबाळे व अजिंक्य रामभाऊ उबाळे फाउंडेशन तर्फे यमुनानगर येथे ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले त्यामध्ये पाचशे ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अंकुश जगदाळे यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. अंकुश जगदाळे, गणेश इंगवले, तुकाराम वारंग, आप्पा काळोखे, शशी किरण गवळी, दमयंती गायकवाड, नयना पारखे, यमुना नगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले व अशोक नहार आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नारायण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button