ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

अमेरिकेहून परतलेले अविष्कार हजारे यांचे ‘सुखाई सोलर एनर्जी’ ऑफिसचे उद्घाटन आमदार महेश लांडगे व आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत संपन्न

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सौरऊर्जेच्या माध्यमातून भारतात उर्जासाक्षरता वाढवण्यासाठी आणि स्वच्छ उर्जेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘सुखाई सोलर एनर्जी’ या कंपनीच्या ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) ऑफिसचे उद्घाटन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते, तर विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडले.

या कंपनीचे संस्थापक कु. अविष्कार हजारे हे भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. पोपटराव हजारे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अमेरिका येथून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन, सौरऊर्जेच्या क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प केला. घराघरात सोलर बसवून समाजात ऊर्जा बचतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

उद्घाटनप्रसंगी आमदार महेशदादा लांडगे यांनी अविष्कार हजारे यांचे कौतुक करताना सांगितले की, “विदेशातून शिक्षण घेऊन आलेले तरुण आज देशात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने काम करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. सौरउर्जेसारख्या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला चालना देणे ही काळाची गरज आहे.”

आमदार अमित गोरखे यांनीही अविष्कारला शुभेच्छा देत सांगितले, “घराघरात सौरऊर्जेचा वापर वाढवून उजळ भारत घडवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा तरुणांनी पुढाकार घ्यावा.”

या उद्घाटन सोहळ्यास विविध राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे पीआय विठ्ठल साळुंखे, उद्योजक निलेश नेवाळे,टाटा मोटर्स कंपनी युनियनचे माजी अध्यक्ष सचिनभैय्या लांडगे, माजी नगरसेवक नारायणराव बहिरवडे, राजू दुर्गे, भाजपा शहर उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे,राष्ट्रवादी ओबीसी मोर्चे अध्यक्षा सारिका पवार,भाजपा सरचिटणीस अजय पताडे, किसन बावकर टाटा मोटर्स कार प्लांट युनियन अध्यक्ष माऊली तळेकर, रवि गुजर, संतोष कापसे, राजू नातू, महादेव कवितके, सुहास ताम्हाणे, अरुण पडोळे, सुधाकर धुरी, गोरख पाटील, संतोष ठाकूर, नामदेव पवार, बाळासाहेब गंगावणे, सागर देसाई आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button