ताज्या घडामोडीपिंपरी
“पत्रकारांच्या लेखणीतून उजळतो समाजाचा दीप — सुजाता नखाते
पत्रकारांचा सन्मान म्हणजे सत्याचा सन्मान — नखाते दांपत्यांच्या पुढाकाराने दीपावली फराळ सोहळा स्नेहमयी वातावरणात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पत्रकार हे समाजाचे खरे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या लेखणीतील सत्यतेचा प्रकाश समाजाला दिशा देतो आणि अंधारातही मार्ग दाखवतो,” असे मत शिवसेनेच्या विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या, “पत्रकार हे लोकशाहीचे सजग प्रहरी आहेत. त्यांच्या लेखणीत प्रामाणिकपणा आणि निडरता आहे. सत्य, निष्पक्षता आणि न्याय यांचे रक्षण हेच त्यांचे खरे धर्मकार्य आहे. कधी भ्रष्टाचार उघड करताना, तर कधी सामान्य माणसाच्या आवाजाला शब्द देताना — पत्रकार समाजातील प्रत्येक थरापर्यंत प्रकाश पोहोचवतात. म्हणूनच दीपावलीसारख्या प्रकाशाच्या उत्सवात आम्ही त्यांच्या कार्याला सलाम करतो.”
दीपावलीनिमित्त शिवसेनेचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार हक्क व गुन्हेगारी नियंत्रण संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुजाता हरेश नखाते यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी दिवाळी फराळ व चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम स्नेहमयी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर, विजय जाधव, दादाराव आढाव, संजय गायखे, गणेश हुंबे, अनिल वडघुले, लीना माने, संतोष जराड, महेश मंगवडे, संतोष गोठवडे, सागर सूर्यवंशी, विनय सोनवणे, राम पाटील, महावीर जाधव, मंगेश सोनटक्के यांच्यासह अनेक पत्रकारांनी उपस्थिती लावली.
हरेश नखाते यांनी पत्रकारांचे स्वागत करताना म्हटले,
“दीपावली हा केवळ दिव्यांचा सण नसून, आपुलकी आणि विश्वासाचे नाते जपण्याचा उत्सव आहे. पत्रकारांच्या सहवासात हा प्रकाश अधिक उजळतो.”
कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांनी पारंपरिक दिवाळी फराळ व चहापानाचा आनंद घेतला. संवाद आणि आत्मीयतेने भरलेला हा सोहळा औपचारिकतेपेक्षा आपुलकीचा अनुभव देणारा ठरला.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर यांनी आयोजकांचे अभिनंदन करत म्हटले, “पत्रकारांप्रती सन्मान व्यक्त करणारे असे उपक्रम समाजातील बंध अधिक घट्ट करतात. ही परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दस्तगिर मणियार, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, योगगुरू सुरेश विटकर, संभाजी नढे, उद्यान व्यवस्थापक श्री. मोरे, अंकुश कोळेकर, राम खातीमकर, शंकर जाधव, एकनाथ काटे, बाळू येडे, कृष्णा येळवे, शैलेश दळवी, राजेंद्र भरणे, कानिफनाथ तोडकर, रामकिसन वढणे, नरेंद्र हेडाव, तसेच जय हरी ग्रुपचे सदस्य व शिवसैनिक आदी उपस्थित होते.













