चिंचवडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था आणि विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वतीने १० वी १२ वी २०२५ मध्ये माध्यमिक उच्चमाध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात यश मिळविलेल्यांचाही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि लग्नाची वेडी- सिंधू या मराठी मालिकेतील अभिनेत्री सायली देवधर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमाला युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शहरप्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेविका विमल जगताप, युवती सेनेच्या रितू कांबळे, युवतीसेना जिल्हा संघटिका सायली साळवी, श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बोंबले पाटील, संचालक हनुमंत माळी, धनाजी बारणे, बळीराम शिंदे, अनंत येळवंडे, गोपाळ बेलगे, दिपाली गुजर, संतोष बारणे व मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. थेरगाव येथील श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.
खासदार बारणे म्हणाले, अतिशय स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची क्षमता ठेवावी. आई-वडील हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण देत आहेत. त्याची जाणीव ठेवून अभ्यास करावा. आताच्या काळात केवळ पदवी मिळण्यास महत्व देऊ नये, बौद्धिक, व्यावसायिकही ज्ञान घेतले पाहिजे. शिक्षणाला मर्यादा नाही. गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली असून काहींना १०० टक्के गुण मिळत आहेत. प्रत्येकाच्या अंगात काही तर सुप्त गुण असतात. कला असते. ते ओळखून ध्येय ठेऊन वाटचाल करावी. ध्येयवादी रहावे. त्यादृष्टीकोनातून शिक्षण निवडावे आणि त्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
विश्वजीत बारणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ, अध्यात्माला महत्व द्यावे. स्मरण शक्ती, ताणतणावमुक्त राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. सोशल मिडियाचे जेवढे फायदे, तेवढे तोटेही आहेत. डिजीटल युगात सोशल मिडियाचा प्रचंड वापर वाढला आहे. त्याचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये वाहत जाऊ नये.
चांगल्या गुणांनी दहावीत उत्तीर्ण झालेल्या समिक्षा नितीन अगरवाल , शमिका सुनील माईनकर , कवीश श्रीवास्तव , श्रेया विशाल ताठे
सिद्धीता आनंद जाधव, स्नेहा विजय गाडगीळ, अथर्व सुनील फाळके, बारावी उत्तीर्ण झालेल्या समिक्षा जयसिंग परमार , पारस संदीप जगदाळे , समिक्षा बापूसाहेब सानप , तनिष्का संजय पवार यांचा गौरव करण्यात आला. तर, प्रांजल आरुण जाधव हिचा रोलिंग बॉल स्पर्धेत सुर्वण पदक मिळवल्याबद्दल , तसेच वैभव गणेश रोकडे याचा ( पीएसआय) झाल्याबद्दल व ऋषिकेश सुनिल भांगरे सीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन लेप्टनन पदावरती सिक्कीम येथे पोष्टींग झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.













