ताज्या घडामोडीपिंपरी

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि कर्मचारी कल्याणाच्या विविध प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिका पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झेमिनेशन इन मेडिकल सायन्सचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिक्षण सुरू करणे, अ,क,ड,ग,क,फ,ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविद उद्यानांची देखभाल दुरूस्तीची कामे करणे, सेवानिवृत्त/मयत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखा विभागामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी मानधनावर नियुक्त करणे, महापालिका हद्दीतील भुमिगत मलवाहिन्या आधुनिक यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी तसेच त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी यंत्र महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करून घेणे, द हिंदू ग्रुप यांचेकडील साप्ताहिक वृत्तपत्र द हिंदू यंग वर्ल्ड विद्यार्थ्यांना वाटप करणे, महापालिका रुग्णालयांमध्ये कार्डिऍक कलर डॉपलर/२-डी एको व ट्रेडमिल टेस्ट ही सेवा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button