पिंपरीत एसएसटी श्री सिद्धविनायक वडापाव सेंटर मध्ये चोरी; अकराविरोधात गुन्हा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिलक्स चौकातील हॉटेल एसएसटी श्री सिद्धविनायक वडापाव सेंटर मध्ये चोरी झाली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 26) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 331(4), 305, 3(5) कलमान्वये अकरांवर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार 25 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे घडला.
1) संजय मनोहर पवार 2) दत्ता मनोहर पवार 3) शुभम संजय पवार 4) मुन्ना संजय पवार (5) संतोष चव्हाण 6) हेंमत दत्ता पवार सर्व राहणार काळेवाडी 7) उमेश मधुरे रा. रुपी नगर निगडी 8) अमर सोमेश्वर लाड रा. मोशीगाव 9) मयुर (पूर्ण नाव माहीत नाही) रा. जाधववाडी, चिखली 10) प्रदीप यादव रा. जाधववाडी, चिखली व 11) मनोज मधुरे रा. चिंचवड स्टेशनपुणे अशी संशयित आरोपीची नावे आहेत. याबाबत अजीमुद्दीन निजामुद्दीन अन्सारी (रा. मल्हारगड, बी-16, सेक्टर 12, मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली.
मात्र, संशयित आरोपींनी दिनांक 25/08/2025 रोजी रात्री 02/30 वा. सुमारास वरील अ.क्र. 1 ते 11 या सर्वानी मिळुन फिर्यादी याच्या दुकानात कोणीही नाहीत हे माहित असतानाही दुकानाचे कुलुप तोडुन आतमध्येप्रवेश करुन खालीलप्रमाणे-अंदाजे किंमत 12,00,000/- रुपये 1) स्टील कांऊटर, 2) हॉट केस 3) 10 नग एलईडी टिव्ही 32 इंच चे, 4) 2 नग तांदूळ दळायचे ग्राइंन्डर मशीन, 5) 3 नग चटणी बनवायचे ग्राइंन्डर मशीन, 6) 9 नग सी.पी. प्लस कंपनीचे कॅमेरे व 1 नग डिव्हीआर, 7) चिमणी, 8) 2 नग सिलींग फॅन, 9) 2 बॅटरी व 1 नग इन्वेटर, 10) 3 नग स्टीलचे टेबल, 11) 6 नग स्टीलचे लहान बाकडे, 12) 1 नग स्टीलचा मोठा बाकड, 13) 2 नग लहान लोखंडी बाकडे, 14) 2 नग लहान लोखंडी बाकडे, 15) 1 नग मोठे बाकड 16) डोसा बनविण्याचे बट्टी, 17) 8 बाय 24 चे रोलींग शटर, 18) थंड पाण्याचे कुलर, 19) कुलर फॅन, 20) कंप्यूटर बिलींग मशीन, 21) सामानाने भरलेली कोका कोला कंपनीचा फ्रिज, 22) सामानाने भरलेली पेप्सी कंपनीचे सिंगल डोअर फ्रिज, 23) सामानाने भरलेली पेप्सी कंपनीचे डबल डोअर फ्रिज, 24) बटाटा सोलायचे मशीन, 25) तीन खुच्र्या, 26) बिसलरी पाण्याचे 25 बॉक्स, 27) 8 पोते बटाटा, 28) 2 पोते कांदा, 29) दुकानातील इतर किराणा समान, 30) दुकानातील भांडे, 31) स्टीलचे दोन मोठे बट्टी व 32) एक श्री सिध्दीविनायक वडापाव नावाचा दुकानाचा बोर्ड इत्यादी साहित्य चोरीला गेल्यानंतर संशयित आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली, अद्याप कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आली नाही.













