ताज्या घडामोडीपिंपरी

“भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने ट्रायोज-झुलेलाल रस्त्याचे काँक्रेट काम सुरू”

Spread the love

 

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  –    पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. या रस्त्यावरून जाणे नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखीचे झाले होते. वाहनांचे अपघात, दैनंदिन वाहतुकीतील अडथळे, पावसाळ्यातील चिखल व पाण्याचे डबके यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.

नागरिकांच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाची दखल घेत  माजी नगरसेवक तथा पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांनी स्मार्ट सिटी विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या रस्त्याच्या काँक्रेटरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

याप्रसंगी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष  शत्रुघ्न (बापु) काटे स्वतः उपस्थित होते आणि या काँक्रिटीकरण कामाविषयी दोन्ही सोसायटीमधील रहिवासीयांशी संवाद साधत या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.

कामाची प्रत्यक्ष सुरुवात होताच परिसरात उत्साह आणि दिलासा निर्माण झाला. नागरिकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले –
“आजवर आम्हाला खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत होता. खूप हाल सोसावे लागले. पण बापूसाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे शेवटी आमचा जुना प्रश्न सुटला. आता कायमस्वरूपी टिकणारा काँक्रेट रस्ता मिळणार आहे.”

या प्रसंगी उद्योजक  विजय जगताप म्हणाले –
“हा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. रोजच्या प्रवासाला, व्यवसायाला आणि परिसराच्या विकासाला याचा थेट उपयोग होणार आहे. त्यामुळे आज नागरिकांना दिलासा मिळाला असून परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे काँक्रेटरीकरण मोठे पाऊल आहे.”

या प्रसंगी  शत्रुघ्न (बापु) काटे म्हणाले –
“नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न सोडवणे हीच खरी जनसेवा आहे. सौदागर परिसरातील रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी व नागरिकांना खड्डेमुक्त, दर्जेदार रस्त्यांची सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.विशेष म्हणजे, या रस्त्यालगतच शाळा असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा मोठा फायदा होणार आहे.”

या काँक्रेटरीकरणामुळे परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली असून आता या भागात खड्डेमुक्त आणि कायमस्वरूपी रस्त्याचे स्वप्न साकार झाले आहे.

यावेळी उद्योजक  विजय जगताप, संजय भिसे, कुंदा भिसे, धनंजय भिसे, अनिल काटे,सोसायटी मधील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button