टीका आणि प्रशंसाचा समतोल साधणारा माणुसच खऱ्या अर्थाने जगाच्या कौतुकास पात्र ठरतो – अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टीका आणि प्रशंसाचा समतोल साधणारा माणुसच खऱ्या अर्थाने जगाच्या कौतुकास पात्र ठरतो, अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मुंबईत व्यक्त केले.
मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुंबई येथे फिनिक्स पुरस्कार देत विशेष सन्मान करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण हॉल मध्ये हा सत्कार घेण्यात आला, यावेळी अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्याचे कौशलविकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक,सकाळ माध्यमाचे संपादक निलेश खरे, दैनिक लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर, दैनिक पुढारीचे संपादक विवेक गिरधारी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यकमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी करताना पत्रकार संघांची भूमिका थोडक्यात विषद केली.यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरील व्हीडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले.
यानंतर सर्व मान्यवरांचे मनोगत व्हीडिओ संदेश दाखवत व्यक्त झाले.सत्कारास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून हितचिंतकच असतात आणि त्यांनी मिळून लोकशाहीला प्रगल्भ केले पाहिजे, पत्रकारांनी टिकेसोबत सत्याची दुसरी बाजूही मांडली पाहिजे.
पत्रकारानाही योग्य ते पाठबळ देणे ह राज्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.विरोधकना मी खाक होत आहे असे वाटत असतानाच मी सकारात्मकरित्या वागल्यानेच पुन्हा एकदा भरारी घेऊ शकलो, त्यामुळेच हा पुरस्कार श्री श्री रविशंकर यांच्या हातून स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात रविशंकर म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देऊन मराठी पत्रकार संघाने अतिशय योग्य माणसालाच योग्य पुरस्कार दिला आहे, पण हाच पुरस्कार पूढील वर्षी देताना पत्रकार संघा चा कस लागेल, कारण देवेंद्रजीना हा पुरस्कार देऊन त्यांनीच एक खास आदर निर्माण केला आहे.
मराठी पत्रकार संघाचे संघटक संदीप पारोळेकर, सचिव हरीभाऊ प्रक्षळे, विवेक इनामदार, डॉ शिबू नायर, अनिल माने, पंकज बिबवे आदी यावेळी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले




















