नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये’ ट्रॅश ‘लघुपटाला मानांकन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ‘नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ मध्ये ‘ट्रॅश’ या लघुपटाला मानांकन मिळालं. ट्रॅश’ हा लघुपट सामाजिक विषयावर प्रबोधन करणारा लघुपट असून शासकीय योजनावर कचरा व्यवस्थापन करून समाज स्वच्छ राहावा हे भाष्य करणारा आहे, तसेच आपल्या सभोवतालच्या गावात – शहरात इतरत्र पडलेला कचरा – अस्वच्छता पाहून कचरा निर्मूलन करण्याचे या लघुपटातील शिक्षक ठरवतो व त्याबददलची तळमळीचा प्रवास कथेतून दिसून येतो ‘निर्मिती फिल्म कल्ब” तर्फे सदरील फेस्टीवल भरविण्यात आले होते.
लघुपटाची निर्मिती अरुण काळे, नितिन कांबळे यांची दोघांची असून दिग्दर्शक अरुण काळे यांचे आहे. सह-दिग्दर्शक संभाजी खांडेकर यांचे आहे. अरुण काळे, सतिश पवार, सयाजी ठाकूर, दिलीप पाटील, दिपली पाटील, मनिषा जुन्नरकर, एम. भरतराज यांच्या भूमिका आहेत, आश्विनी कुमावत यांचे गीत गायन गौरी पाटील यांचे आहेत. संकलन प्रशांत गायकवाड यांचे आहे.









