ताज्या घडामोडीपिंपरी

शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन

“आरती संग्रहातून नव्या पिढीला संस्कार” - संतोष सौंदणकर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड तथा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या तिसऱ्या गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन रविवारी (दि. ३१) मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी उपनेत्या सुलभा उबाळे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील हगवणे, उपशहरप्रमुख दिलीप पांढरकर, पुणे जिल्हा रेल्वे समिती सदस्य तथा पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन देसले, विशाल राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सौंदणकर यांचा हा तिसरा आरती संग्रह असून याआधी प्रकाशित झालेल्या संग्रहांना गणेशभक्तांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना गणेशोत्सव हा सामाजिक, सांस्कृतिक आणि एकात्मतेचा उत्सव असल्याचे सांगितले. पारंपरिक भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या अशा आरती संग्रहांमुळे नव्या पिढीला संस्कार मिळतात आणि भक्तीबरोबरच समाजाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना संतोष सौंदणकर म्हणाले, “गणपती बाप्पा हे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आरती व भजनांमधून समाजात भक्तीभावाबरोबरच चांगले विचार रुजावेत, हीच आमची इच्छा आहे. या आरती संग्रहाद्वारे नव्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button