ताज्या घडामोडीपिंपरी
शिवसेना उमेदवारी अर्जांना उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 148 अर्ज वाटप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून मिळालेल्या अर्जवितरण प्रक्रियेला तिसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरप्रमुख राजेश वाबळे यांच्या उपस्थित अर्जवितरणाची प्रक्रिया पार पडली.
9 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण 47 अर्ज वाटप करण्यात आले. 10 नोव्हेंबरला दुसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 62 अर्ज वाटप करण्यात आले. 11 नोव्हेंबरला तिसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 39 अर्ज वाटप करण्यात आले. अशाप्रकारे तीन दिवसांत एकूण 148 अर्ज वितरित झाले असून उमेदवारीसाठी शिवसैनिकांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
अर्जवितरण नियोजनात सौ. श्वेताताई कापसे, सौ. तेजश्रीताई ढोरे-पाटील तसेच शिवसेना सोशल मीडिया टीमचे विशेष योगदान राहिले.
पक्ष संघटनेची निवडणूकपूर्व तयारी आणि वाढता उत्साह यामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.



















