ताज्या घडामोडीपिंपरी

निगडीचा रणसंग्राम पेटला ,  शिवसेनेची पदयात्रा, अभिनेत्री पूजा काळेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

Spread the love

निगडीचा रणसंग्राम पेटला ,  शिवसेनेची पदयात्रा, अभिनेत्री पूजा काळेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक १३ क मध्ये शिवसेनेच्या रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) पक्षाच्या वतीने सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, तानाजी शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत ही पदयात्रा पार पडणार असून, निगडी वसाहत, निगडी स्मशानभूमी परिसर, आजाद चौक, राहुल नगर, विलास नगर, राज नगर, संजय नगर, इंदिरा नगर व संगम नगर परिसरातून ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे.

या पदयात्रेमध्ये शिवसेनेचे पक्षाचे अधिकृत उमेदवार जनतेशी थेट संवाद साधत विकास, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार आहेत. विशेष म्हणजे या पदयात्रेला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, “जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेली शिवसेना” असा संदेश या पदयात्रेतून देण्यात येणार आहे. पदयात्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर पक्षाचा भर असल्याचे चित्र आहे.

खालच्या स्तरावर पक्ष संघटन मजबूत करत शिवसेनेने या प्रभागात निवडणूक रणधुमाळीला जोरदार सुरुवात केली असून, पदयात्रेमुळे विरोधकांच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. निगडी परिसरात शिवसेनेची ताकद दाखवणारी ही पदयात्रा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button