पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरात आकर्षक नवनाथांकडून पुजा देखावाची सजावट

आळंदी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त कुरुळी येथील महादेव मंदीरात शिवलिंगावर व आस पास डोळे दिपुन जातील असा नवनाथांच्या वतीने पुजा करत असताना देखाव्याची मांडणी करण्यात आली. नाथ पथांची स्थापना ही शिव शंकरांनी केली असल्याने नव नाराणाचे अवतार असणारे नवनाथ यांच्या कडून शिव लिंगाची पुजा करत असताना हा देखावा जिवंत असल्याचे जाणवत होते हा आकर्षक देखावा सादर करण्यात आला.
शिव तांडव ग्रुपचे सर्व सदस्यांनी नवनाथाचा पुजा या देखाव्यासाठी खुप मेहनत घेतली. या ग्रुपने श्रावण चालु झाल्यापासुन विविध देखावे सादर करणार आहेत. आज निमित्त पहाटे शिव पिंडीवर अभिषेक, देखाव्याची मांडणी तदनंतर आरती होऊन शिवस्रोत्र पठण केले. तसेच पठण झाल्यावर साबुदाणा खिचडी व केळीचा वाटप करण्यात आले. गावच्यावतीने माजी जिल्हा परीषद सदस्य शांताराम सोनवणे यांनी शिव तांडव ग्रुपचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.















