नवीन चेहऱ्यांचा विश्वास – आम आदमी पार्टीची ताकद! शिवकुमार बसवराज बनसोडे यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवकुमार बसवराज बनसोडे यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.समाजकारणाशी निष्ठा आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते शिवकुमार बसवराज बनसोडे यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते श्री. सुरेश गायकवाड आणि शहराध्यक्ष श्री. रविराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विकी पासोटे यांच्या नेतृत्वाखाली बनसोडे यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारत आम आदमी पार्टीच्या विचारधारेबद्दल आपला विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले की, “सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारदर्शक, स्वच्छ राजकारण घडविण्यासाठी आम आदमी पार्टीचाच मार्ग योग्य आहे. मला या पक्षाच्या विचारांशी आणि कार्यपद्धतीशी आत्मीयता वाटते.”
याच सोबत सोनू बाळासाहेब हिंगे, मयूर अशोक गंगावणे, नागेश बसवराज गायकवाड, लक्ष्मण भाजपा शिवशरण आणि प्रवीण केंजळे यांनी देखील आम आदमी पार्टीत प्रवेश करून पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याची ग्वाही दिली.
त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, पिंपरी चिंचवड शहरातील जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास शहराध्यक्षांनी व्यक्त केला.













