शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा प्रबोधनात्मक देखावा विद्यार्थ्यांच्या सृजनात्मक कलागुणांना संधी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरणपूरक उत्सवाबरोबरच जनजागृतीचा संदेश देणारा “मोबाईल व्यसनमुक्ती” हा देखावा इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट येथे गणेशोत्सवात सादर करण्यात आला आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे समाजात निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी गणेश मूर्तीसमोर मोबाईल व्यसनमुक्ती संदर्भातील देखावे ठेवले आहेत. तसेच मोबाईल व्यसनमुक्तीवर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या अध्यक्षा पद्मा भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला आहे.
यावर्षी उत्सवासाठी मूर्ती ही वर्तमानपत्रांच्या लगद्यापासून संस्थेच्या जावेद हबीब अकॅडमी विभागातील विद्यार्थ्यांनी बनवली आहे. मूर्तीची सजावट करण्यासाठी प्लॅस्टिक न वापरता विविध प्रकारच्या कागदांचा वापर केला आहे. “श्रीं”च्या मूर्तीचे वस्त्र फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
बुधवारी, (दि.२७ संस्थेच्या कार्यालयात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख भारत बोराटे, सामाजिक कार्यकर्ते हमीद अत्तार आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.
यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक दिपक जगताप, प्रकल्प अधिकारी सागर कांबळे, जावेद हबीब विभाग प्रमुख अमोल राऊत, फॅशन डिझाइन विभाग प्रमुख त्रिशला पाटील, ब्युटी विभागाच्या रोहिणी जाधव, भारत माने उपस्थित होते. श्रद्धा पवार, आदिती पवार, पुनम गवळी, सुरज जाधव, विजय दळवी, प्रीतम करगळ, विजय गोरे, आदित्य वाघमारे, जॅस्मिन बडकर, पवन नामदास, सपना गायकवाड, शितल राठोड, अथर्व सरोदे, समिक्षा कवितगे, वैष्णवी गुणवरे, जिनत सय्यद,सिंधू जाधव, साक्षी यादव, मंदा ढावरे , आरती कुंभार, अश्विनी बाबर या विद्यार्थ्यांनी देखावा सजावट करण्यात सहभाग घेतला.















