ताज्या घडामोडीपिंपरी

थेरगाव येथील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघांचा’ पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न’

Spread the love

 

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील ‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघांचा’ पहिला वर्धापन दिन ‘१९ ग्रँड वेस्ट सोसायटीच्या’ आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जेष्ठ नागरिक संघात एकूण १०९ नोंदणीकृत प्राथमिक सदस्य आहेत.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सिताराम आरुडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन, सल्लागार चंद्रकांत पाठक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर सचिव ईश्वर शिवणे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून गणेश वंदनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला..

सुमधुर मराठी व हिंदी गाणी, अभंग, मनमोहक नाट्यगीते, नेत्र दीपक नृत्य, हास्य रसात बुडवून टाकणारे कलात्मक अ‍ॅक्ट असे विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम या स्नेहमिलनाच्या निमित्ताने सादर करण्यात आले. देश व राज्य संरक्षण सेवेतून निवृत्त झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला..

सीताराम आरुडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यामातून मागील एक वर्षांच्या कामाचा आढावा दिला. मागील वर्षभरात विविध उपक्रम राबविले. प्रामुख्याने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण, ज्येष्ठांचे आरोग्य कसे राखले जावे याबाबत तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. या कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला आहे. तसेच ७५ वर्ष व त्यापुढील सदस्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविणे, मासिक वाढदिवस साजरे करणे, शासकीय कार्यक्रमात जेष्ठांनी भाग घेणे, सोसायटीतील मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, त्याचबरोबर गणेश उत्सव व इतर धार्मिक सण उत्साहात साजरे करणे, मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या ‘ज्येष्ठाणुबंध’ ॲप मध्ये सोसायटीमधील ज्येष्ठांची माहिती भरून पोलिसांना सहकार्य करणे असे विविध प्रकारचे उपक्रम संघा मार्फत राबविण्यात आलेले आहेत..

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार सुनील मंडलिक, सह खजिनदार डॉ. सुनील शिंदे, उपाध्यक्षा संगीता ततार, सह सचिव मारुती जाधव, महिला सदस्या श्रीमती सुनिता नवसे, सदस्य दिलीप जिरवणकर, सदस्य प्रदीप मुनोत यांच्या सह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते..

आशिष कोठावदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव ईश्वर शिवणे यांनी आभार मानले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button