“देशभक्तीची भावना केवळ शब्दात नाही तर, कृतीतून दिसली पाहिजे”- संतोष सौंदणकर
स्वातंत्र्य दिनानिमित्त रस्टन कॉलनी, अहिर सुवर्णकार समाज आणि शिवसेना वेताळनगर शाखेत ध्वजारोहण उत्साहात संपन्न

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचवडगावातील रस्टन कॉलनी, अहिर सुवर्णकार समाज आणि शिवसेना वेताळ नगर शाखा अशा तीन विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वेताळनगर शाखा येथे शहर संघटक संतोष सौंदणकर, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, सागर चिंचवडे , इमरान पानसरे, सागर चिंचवडे, शाखाप्रमुख मजीद शेख, कय्युम पठाण, किशोर सातपुते, रफिक बेग, कुदरत खान, राजू मासाळकर, शिवाजी तांबे, पत्रकार बाप्पू गोरमाळे, सपना बनसोडे, कलावती नाटेकर, माया कुलथे, यास्मिन पठाण, रूपाली तेलंगी, रेखा गायकवाड, अंजना करांडे, अश्विनी धावरे, राणी काळभोर, शितल काशीद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
रस्टन कॉलनी येथे अध्यक्ष डी. एम. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विलास कंक, असलम शेख, सुभाष मालुसरे, पवार ताई, सुमित कांबळे, आर. जी. पाटील, गुलाब मुलाणी, फिरोज खान, महेश कुंभार, मोहन वायकुळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान अहिर सुवर्णकार समाज पिंपरी-चिंचवड येथे प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. योगेश अहिरराव त्याच्या पत्नीसह उपस्थित होते. तसेच समाजाचे अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार,दीपक सोनार, सुनील निकुंभ, कैलास पैठणकर, प्रवीण दुसाने, सचिन देवरे, महिला प्रमुख स्मिता सोनार, अनिता सोनार, यांच्यासह समाज बांधवांनी सहभाग घेतला. तीन्ही ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी “स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशाच्या अभिमानाचा आणि बलिदानाच्या आठवणींचा दिवस आहे. अशा दिवशी समाजातील सर्व घटक, विविध पिढ्या आणि संघटना एकत्र येऊन ध्वजाला सलाम करतात, हीच खरी एकतेची ताकद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले; आता या स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. देशभक्तीची भावना केवळ शब्दात नाही तर कृतीतून दिसली पाहिजे, आणि यासाठी समाजाने एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे,” असा संदेश मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.















