संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 553 गणेश मूर्तींचे दान आणि 3 टन निर्माल्य

गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व ब प्रभाग अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 553 गणेश मूर्तींचे दान मिळाले आणि 3 टन निर्माल्य स्वीकारले.
या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड, प्रभाकर मेरुकर, वसंत दळवी, सायली सुर्वे, संध्या स्वामी, भरत शिंदे, सुप्रिया गायकवाड, पल्लवी नायक, अनुशा पै, अरुण कळंबे, रमेश भिसे, सुशीलकुमार गायकवाड, शब्बीर मुजावर यांनी केले होते.
पिंपरी चिंचवड ब प्रभाग तानाजी देवकर कनिष्ठ अभियंता विक्रम जोगदंड रमेश कापुरे मजूर अतिक्रमण विभाग ब अनिल ढाले,मसुब जवान अतिक्रमण विभाग ब यांनी सहकार्य केले.















