ताज्या घडामोडीपिंपरी

सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष  संजीवन सांगळे यांच्या हस्ते केले  सौर ऊर्जा   प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण

Spread the love

चिखली जाधववाडी येथील इमॅजिका पार्क सहकारी गृह रचना संस्थेने सोसायटीच्या स्वखर्चाने बसवला ४० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जाधववाडी चिखली येथील इमॅजिका पार्क सोसायटीने 40 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवला असून या प्रकल्पामुळे ही सोसायटी विजेसाठी स्वावलंबित झाली आहे.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सदर सोसायटीला प्रत्येक महिन्याला येत असणारे भरमसाठ विजेचे बिल आता शून्य झाले आहे. उलट सदर प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनी विकत घेणार आहे.
सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सदर सोसायटीचे चेअरमन श्री प्रशांत निखाडे त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर आणि बहुसंख्य असे सभासद उपस्थित होते. सोसायटीने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सोसायटीधारकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण होते.

इमॅजिका पार्क सोसायटीने जो सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे त्यामुळे सोसायटीला निसर्गाने दिलेली स्वच्छ, सुंदर आणि हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास देखील थांबून सोसायटीचा देखभाल खर्च देखील कमी होणार आहे. सोसायटी फेडरेशन मार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटीधारकांना आवाहन करण्यात येते की ,सर्वांनी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून पर्यावरणाचे रक्षण करावे आणि सोसायटीच्या खर्चात देखील बचत करावी.
संजीवन सांगळे, अध्यक्ष, हाउसिंग सोसायटी फेडरेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button